EID E MILAD : बारामतीत सामाजिक उपक्रम राबवत ‘ईद ए मिलाद’ साजरा; अनावश्यक खर्चाला दिला फाटा

बारामती : न्यूज कट्टा

बारामती येथील इफ्तेखार अन्सार आतार मित्र परिवार व हंन्टर बॉईज ग्रूपच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलादनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. बारामतीत निघालेल्या मिरवणुकीत सहभागी बालचमूंना केक वाटप करण्यात आले. तसेच डिजेसह अनावश्यक खर्चाला फाटा देत बारामती शहरात एक हजार शैक्षणिक किट वितरित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून आणि युवा नेते पार्थ पवार, जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. रायटींग पॅड, वह्या, कम्पास साहित्य, कलर स्केचपेन, पेन, इंग्रजी अंकलिपी अशा शालोपयोगी साहित्याचा समावेश असणारे कीट बारामती शहरातील अरबी शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वाटप करण्यात आले.

इफ्तेखार आतार, आसीम तांबोळी, अबूतल्हा बागवान, साबीर पठाण, शाहरुख शेख, अबुजर बागवान, वसीम बागवान, साद बागवान, हुजेफ झारी, हसन आत्तार, अदनान आत्तार, अदनान बागवान, जैद बागवान,  असद सय्यद, इरफान पठाण, साहिल शेख, मोईन तांबोळी, साहिल सय्यद, अजीम शिकीलकर, शाहिद शिकिलकर, मुसेफ बागवान, ताहिर शेख, आवेज शेख यांनी हा उपक्रम राबवला.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!