BIG BREAKING : बैठक सुरू असतानाच अचानक मोहोळ उठलं अन मधमाशांनी केला हल्ला; मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं..?

आंतरवाली सराटी : न्यूज कट्टा  

मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी हैद्राबाद गॅझेटनुसार नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करून घेतली. त्यानंतर या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे बैठक बोलवली होती. या बैठकीदरम्यान, अचानक मोहोळ उठलं आणि मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यामुळे सगळ्यांचीच पळापळ झाली. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा समाजाची कुणबी नोंद लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथील एका शेतात निवडक समन्वयकांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक मोहोळ उठलं आणि मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. यावेळी काहींनी तात्काळ मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षित स्थळी नेले. जवळची उपरणी डोक्यावर घेत जरांगे पाटील यांना बाजूला नेण्यात आले. या दरम्यान, काहीजण मधमाशांनी चावा घेतल्यामुळे जखमी झाले आहेत. अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!