BARAMATI CRIME : बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटलं; बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांना केली अटक

बारामती : न्यूज कट्टा

बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला दुचाकीवर निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांना शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी  पोलिसांनी मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न केली करण्यात आली. त्यानुसार गुड्ड्या बगाडे (रा. माळेगाव, ता. बारामती), गणेश गोपीनाथ खरात (अटक) (वय १९, रा. सुहासनगर, आमराई, बारामती) आणि विधीसंघर्षित बालक (वय १७, रा. सुहासनगर, आमराई, बारामती) अशी नावे समोर आली. त्यापैकी आरोपी गणेश खरात याला अटक करण्यात आली असून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपीस 03 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्था.गु.शा. निरीक्षक अविनाश शिळीमकर  यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार भारत खारतोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील श्रेणी पोसई बी.डी. कारंडे आणि पो.हवा. स्वप्नील अहिवळे यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!