BARAMATI BREAKING : जय पवार बारामतीचे नगराध्यक्ष होणार..? अजितदादांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल स्पष्टच सांगितलं..!

बारामती : न्यूज कट्टा   

बारामतीचे नगराध्यक्षपद युवा नेते जय पवार यांना संधी मिळेल अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. जय पवार यांच्या नगराध्यक्षपदाच्या चर्चा मीही ऐकल्या आहेत. परंतु असं काहीच होणार नाही असं सांगतानाच बारामतीच्या नगराध्यक्षपदाची संधी कुणाला द्यायची याबाबत मुलाखती घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असं अजितदादांनी जाहीर केलं आहे.

बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून अनेक इच्छुकांनी अजितदादांची सहयोग निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. अनेकजण नगराध्यक्षपद आणि नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे सकाळपासून अनेकांनी भेटी घेतल्या. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे अजितदादांनी जाहीर केले.

बारामतीच्या नगराध्यक्षपदी जय पवार यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. याबाबतही अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जय पवार यांच्या नगराध्यक्षपदाबाबत मीही चर्चा ऐकली आहे. परंतु असं काहीही होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं जय पवार यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, बारामतीचा नगराध्यक्ष निवडताना सर्वंकष बाबींचा विचार केला जाईल, त्यानंतरच योग्य उमेदवार निवडला जाईल, असेही अजितदादांनी स्पष्ट केले आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!