BIG BREAKING : बारामतीत ईडीची पुन्हा धाड; लखोबा लोखंडेच्या नातेवाईकाकडे ईडीकडून चौकशी सुरू, मोठा मासा गळाला लागणार..?

बारामती : न्यूज कट्टा   

एका आमदाराची जवळीक सांगून अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद लोखंडे याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील महिन्यापूर्वीच आनंद लोखंडेशी संबंधित ठिकाणांवर एकाचवेळी ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर आज त्याच्या बारामती येथील एका नातेवाईकाच्या घरी ईडीने छापा टाकत चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, ईडीच्या एकापाठोपाठ धाडसत्रामुळे या प्रकरणात मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रासह पराराज्यातील उद्योजकांना आनंद लोखंडे याने कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे. तसेच त्याने अनेक शासकीय अधिकाऱ्यांचीही फसवणूक केली आहे. त्याने आतापर्यंत २०० ते ३०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्या या कारनाम्याचा सर्वप्रथम ‘न्यूज कट्टा’च्या माध्यमातून पर्दाफाश करण्यात आला होता. मुंबईत त्याच्यावर १० कोटींची फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रायपूर, बारामती आणि पुण्यातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याचीही त्याने तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणातही आनंदसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. जवळपास ३०० कोटी रुपयांची फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे हे प्रकरण आता ईडीकडे गेले आहे. डिसेंबर महिन्यात ईडीने आनंद लोखंडे याच्याशी संबंधित तीन ठिकाणी धाड टाकली होती. त्यानंतर आज पिंपळी-लिमटेक येथील त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी धाड टाकून चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ईडीने आनंद लोखंडे याच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाच्या घरी धाड टाकली आहे. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जात असून या कारवाईतून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, पहिल्या गुन्ह्यातून जामीन झाल्यानंतर आनंद हा त्याच्या कुटुंबियांसह फरार झाला असून त्याच्या शोधाच्या दृष्टीनेही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!