AJITDADA : अजितदादा उद्या बारामतीत; बारामती, होळ आणि सुप्यात बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा 

बारामती : न्यूज कट्टा 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते विविध बैठका घेणार आहेत. त्यानंतर बारामती, होळ आणि सुप्यात बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होणार असून बारामतीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.

अजितदादा उद्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ६ वाजता पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता पाटस रस्त्यावरील वृंदावन गार्डन येथे बुथ कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता होळ येथील सोमनाथ मंगल कार्यालयात बुथ कार्यकर्ता मेळावा, दुपारी ३.३० वाजता जळगाव कडेपठार विकास सोसायटीचे उदघाटन होईल.

दुपारी ४ वाजता काऱ्हाटी येथील विविध विकासकामांचे भुमीपूजन होणार आहे. त्यानंतर ५ वाजता सुप्यातील विविध विकासकामांच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर सुपे येथील माऊली गार्डन येथे बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!