AJITDADA CRAZE : भरगच्च व्यासपीठावर चिमुकला आला अन् गप्पा मारायला लागला.. कोण आवडतं विचारताच म्हणाला, अजितदादा..!

बारामती : न्यूज कट्टा

स्थळ : बारामतीचं रेल्वे मैदान.. अजितदादांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.. अशातच एक चिमुकला व्यासपीठावर येतो.. अजितदादांजवळ जातो आणि त्यांच्याशी गप्पा मारत थांबतो.. दादाही तितक्याच आत्मियतेने त्याच्याशी संवाद साधतात..  हा प्रसंग आहे बारामतीत आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमातला.. या निमित्तानं अजितदादांचा अनोखं रूप अनुभवण्याची संधी बारामतीकरांना मिळाली..

शिस्तप्रिय आणि सतत कार्यमग्न नेते अशी अजितदादांची ओळख सर्वश्रुत आहे. सतत लोकांच्या गराड्यात असणाऱ्या अजितदादांची लहानग्यांमध्येही एक वेगळीच क्रेझ आहे, याचाच प्रत्यय काल बारामतीकरांना अनुभवायला मिळाला. येथील रेल्वे मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामन्यांचा आनंदही लुटला.

दस्तुरखुद्द अजितदादाच कबड्डीचे सामने पाहत असताना एक चिमुकला व्यासपीठावर दाखल झाला.. तो थेट अजितदादांजवळ जाऊन उभा राहिला.. एखाद्या मुरब्बी व्यक्तीप्रमाणे त्यानं अजितदादांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. अजितदादांनीही या लहानग्याला जवळ घेत त्याच्याशी आत्मियतेने संवाद साधला.. यावेळी या चिमूकल्याच्या पालकांनी त्याला कोण आवडतं असा प्रश्न विचारला.. त्यावर या चिमूकल्याच्या तोंडून ‘अजितदादा’ असं उत्तर आलं आणि अजितदादांसह हा प्रसंग पाहणाऱ्या मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला.

दादांनी या चिमूकल्याची आस्थेवाईकपणे विचारपूस करत अगदी त्याच्याशी मनमुराद संवाद साधला. हा प्रसंग अजितदादांची वेगळी छबी दाखवणारा तर ठरलाच, मात्र अजितदादांची चिमूकल्यांमध्ये असणारी क्रेझही दाखवून गेला. एरवी धीरगंभीर वाटणारे दादा या चिमूकल्याशी संवाद साधताना पाहून उपस्थितांच्या तोंडी आपसूक काही शब्द उमटले ते म्हणजे नेता असावा तर असा..!

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!