BARAMATI BREAKING : छत्रपती कारखान्यापाठोपाठ माळेगावचंही बिगुल वाजणार; आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

बारामती : न्यूज कट्टा    

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. शासनाकडून निवडणूक निर्णय अधिकारीही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अशातच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने माळेगावच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निश्चित केले आहेत.

येणाऱ्या काही दिवसात माळेगावच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून त्यानुसार प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती पुढे येत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती सत्ता मिळवली होती. कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनलला काही जागांवर समाधान मानावे लागले होते.

त्यानंतरच्या काळात अजितदादांनी भाजप आणि सेनेशी युती करत सत्तेत सहभाग घेतला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत उत्सुकता असणार आहे. दरम्यान, माळेगावच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!