BARAMATI BREAKING : बारामती नगरपरिषदेची निवडणुक लांबणीवर; आज बारामतीत होणारी अजितदादांची सभा रद्द

बारामती : न्यूज कट्टा

विविध प्रभागांगामधील उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे बारामती नगरपरिषदेची निवडणुक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे २ डिसेंबरऐवजी आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत होणारी सभाही रद्द करण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीचा नविन कार्यक्रम निवडणुक आयोगाकडून जाहिर करण्यात आला आहे. विविध प्रभागातील जागांबाबत संबंधितांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने निर्णय दिलेला असला तरी अपिलाची मुदत संपलेली नाही. त्यामुळं बारामतीसह फलटण आणि महाबळेश्वर येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नव्याने जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार बारामती नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. दरम्यान, आज सायंकाळी शारदा प्रांगण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु निवडणुक पुढे ढकलल्यामुळे आज बारामतीत होणारी सभाही रद्द करण्यात आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!