BARAMATI BREAKING : उपनगराध्यक्ष निवडीपूर्वी बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी; बारामती नगरपरिषदेत तीन अपक्षांचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बारामती : न्यूज कट्टा

बारामती नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा दिला आहे. अपक्ष निवडून आलेल्या नीलेश इंगुले, वनिता सातकर आणि मनीषा बनकर यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आता विरोधातील संख्याबळ केवळ तीनवर आले असून सत्ताधारी राष्ट्रवादीची नगरपरिषदेतील ताकद आणखी वाढली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत सहाजणांनी बाजी मारत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आरती शेंडगे, बसपच्या संघमित्रा चौधरी, अपक्ष नीलेश इंगुले, वनिता सातकर, मनीषा बनकर, यशपाल पोटे यांचा समावेश होता. यातील नीलेश इंगुले, वनिता सातकर आणि मनीषा बनकर यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देत सत्ताधारी गटात राहण्यास पसंती दिली आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधातील सहा उमेदवार निवडून आले होते. त्यामुळं या सहा विरोधी उमेदवारांचा गट होऊन विरोधी पक्षनेता निवड केली जाईल अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात तिघांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता विरोधी गटात केवळ तीनच नगरसेवक उरले आहेत. त्यामुळं राजकीय गणितंही बदलली असून येणाऱ्या काळात याचे परिणामही नगरपरिषदेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!