BARAMATI BREAKING : पुण्यात बोलवलं, दोघींना दारू पाजली अन् नंतर केला अत्याचार; बारामतीतील अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार..!

बारामती : न्यूज कट्टा 

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यात बोलवून त्यांना दारू बाजूने चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्काडायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण अद्याप फरार आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  बारामती शहरातील वेगवेगळ्या शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली दि. १४ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याच्या दोन फिर्याद बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

या दोघीही वेगवेगळ्या शाळेत शिकत असल्या तरी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. त्यातूनच त्या दि. १४ सप्टेंबर रोजी घरात काहीही न सांगता बसने पुण्याला गेल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याला संपर्क साधला. ज्ञानेश्वरने आपल्या दोन मित्रांना या दोघी येत असल्याचं कळवलं आणि तो आपल्या एका मित्रासमवेत पुण्याकडे निघाला. हडपसरमध्ये या दोघींना एका मित्राच्या खोलीवर नेण्यात आले.

रात्री या मुलींना दारू पाजण्यात आली. त्यानंतर या तिघांसह फरार असलेल्या आरोपीने  आळीपाळीने या दोघींवर लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी दि. १५ सप्टेंबर रोजी यातील एका मुलीने आपल्या आईला हडपसरमधून फोन केला. तिच्या आईने तात्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधला. तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधत महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक हडपसरला पाठवले.

त्यानंतर या दोघींना बारामतीत आणण्यात आलं. त्यांचं महिला पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी या दोघींनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केले . त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर अन्य आरोपी निष्पन्न झाले. त्यानुसार अनिकेत बेंगारे आणि सोन्या आटोळे यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे. या तिघांना बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून सामूहिक अत्याचार केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. बारामतीत प्रथमच अशा प्रकारची घटना घडली असून यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!