BARAMATI BREAKING : बारामतीत निवडणुक पुढे ढकलली; दोन प्रभागातील निवडणुक लांबणीवर..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. दोन प्रभागातील निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्र. १३ ब आणि १७ अ या दोन जागांची निवडणुक लांबणीवर टाकण्यात आली आहे. उर्वरीत प्रभागांची निवडणुक निर्धारीत वेळेनुसार पार पडणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी ही माहिती दिली.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निकालानसुसार प्रभाग क्रमांक १३ ब व प्रभाग १७ अ साठी दि. २६ रोजी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. या दोन अर्जांच्या पुढील प्रक्रियेविषयी (छाननी, उमेदवारी मागे घेणे आदी) याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार या दोन जागांचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल असे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजापूरकर यांनी कळवले आहे.

या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मात्र मतमोजणी निर्धारीत दिवशीच होणार किंवा या दोन प्रभागांच्या निवडणुकीनंतर याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळं सध्या तरी बारामती नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!