BARAMATI BREAKING : बारामती एमआयडीसी परिसरात सार्वजनिक ठिकाणी लॉजची जाहिरात लावणं पडलं महागात

बारामती : न्यूज कट्टा

बारामती एमआयडीसी, भिगवण रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी व्हीआयपी लॉज नावाच्या जाहिराती लावणं संबंधितांना महागात पडलं आहे. बारामती नगरपरिषदेने संबंधित व्यावसायिकावर शहर विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बारामती नगरपरिषद हद्दीत अनधिकृत जाहिराती, फलक लावल्यास यापुढेही कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बारामती शहरातील भिगवण रोड, सिटी इन चौक परिसरातील स्ट्रीट लाईट, डीपी बॉक्सवर व्हीआयपी लॉज नावाने जाहिराती लावण्यात आल्या होत्या. या प्रकरणी बारामती नगरपरिषदेने महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपणास प्रतिबंध अधिनियमानुसार संबंधित व्यावसायिक श्रीकांत घुले (रा. काटेवाडी, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बारामती नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख संजय प्रभूणे यांनी याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

बारामतीत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही फलक, जाहिराती अथवा पोस्टर लावण्यास मनाई आहे. त्यामुळे यापुढील काळात अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन केलेलं आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!