बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नगरसेवकपदासाठी नव्या-जुन्यांचा मेळ घालत यादी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत विरोधात असलेल्या सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांचाही राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये समावेश करण्यात आल्याने अजितदादांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी सचिन सदाशिव सातव यांना संधी देण्यात आली आहे. तर नगरसेवकपदाच्या ४१ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून यावेळी उमेदवार देताना मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांचा विचार करण्यात आला आहे.
सचिन सातव हे सध्या बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात बँकेनं प्रगतीचे अनेक टप्पे गाठतानाच कर्ज वसुलीत सातत्य राखले आहे. त्याचबरोबर ठेवीतही वाढ झाली आहे. यापूर्वी त्यांनी बारामती नगरपरिषदेचे गटनेते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. प्रशासकीय कामातील अनुभव लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
आजोबा, आई-वडील आणि आता मुलगा होणार नगराध्यक्ष
विशेष म्हणजे सचिन सातव यांचे आजोबा धोंडीबा आबाजी सातव उर्फ कारभारी अण्णा यांनी सुरुवातीला नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यानंतर सचिन सातव यांचे वडील सदाशिवबापू सातव आणि आई जयश्री सातव यांनीही बारामतीच्या नगराध्यक्षपदी काम केलं असून आता सचिन सातव यांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादीची उमेदवार यादी : नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव, प्रभाग क्र. १ : मनीषा समीर चव्हाण, अविनाश निकाळजे, प्रभाग क्र. २ : जय पाटील, अनुप्रिता डांगे, प्रभाग क्र. ३ : प्रवीण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे, प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर, संपदा चौधर, प्रभाग क्र. ५ : किशोर आप्पासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पागळे, प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल, प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुडे, भारती विश्वास शेळके, प्रभाग क्र. ८ : अमर धुमाळ, श्वेता योगेश नाळे, प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतीबा चव्हाण, प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख, अनीता गायकवाड, प्रभाग क्र. ११ : संजय संघवी, सविता जाधव, प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण, सारीका अमोल वाघमारे, प्रभाग क्र. १३ : बिरजू भाऊसाहेब मांढरे, सुनीता अरविंद बगाडे, प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ, आप्पा अहिवळे, प्रभाग क्र. १५ : जितेंद्र बबनराव गुजर, मंगला जयप्रकाश किर्वे, प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप, गोरख पारसे, प्रभाग क्र. १७ : अलताफ सय्यद, शर्मिला शिवाजीराव ढवाण, प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे, अश्विनी सूरज सातव, प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सस्ते, प्रतिभा विजय खरात, प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रवीण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, आफरीन फिरोज बागवान





