BARAMATI BREAKING : बारामती शहरात रेल्वेखाली चिरडून महिलेचा मृत्यू; आत्महत्या की अपघात पोलिसांकडून तपास सुरू

बारामती : न्यूज कट्टा

बारामतीकडून दौंडच्या दिशेने निघालेल्या रेल्वेखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर ही घटना घडली आहे. दरम्यान, या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू असून ही आत्महत्या की अपघात याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आज दुपारी बारामतीहून दौंडकडे निघालेल्या रेल्वेखाली एक महिला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत या महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेचे शिर आणि धड वेगळे झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान,  हा आत्महत्येचा प्रकार आहे की अपघात याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेनंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!