BARAMATI CRIME : नणंदेच्या लग्नासाठी पाच लाखांची मागणी; विवाहितेला उपाशी ठेवत कुटुंबियांकडून छळ, बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : न्यूज कट्टा

तुला मुलाला सांभाळता येत नाही, स्वयंपाक नीट येत नाही अशा विविध कारणांनी विवाहितेला उपाशीपोटी ठेवत जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच नणंदेच्या लग्नासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सोनम गणेश जोजारे (वय ३२) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती गणेश सुधाकर जोजारे, सासू उमा सुधाकर जोजारे, सासरे सुधाकर छगनराव जोजारे (रा. शारदा पार्क सोसायटी, औंध, पुणे) आणि नणंद प्रिया किरण शहाणे (रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मे २०१४ ते २१ जून २०२४ या दरम्यानच्या काळात सोनम जोजारे यांना त्यांचे पती गणेश यांच्यासह सासू, सासरे आणि नणंद हे सतत उपाशी ठेवून तू मुलाला का मारले असं विचारत तुला कोणतेच काम नीट येत नाही, तू स्वयंपाक नीट करत नाही असं म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच नणंद प्रिया हिच्या लग्नाला दहा तोळे सोने घेण्यासाठी तुझ्या आईवडिलांकडून पाच लाख रुपये आण अन्यथा तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देत घरातून हाकलून देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पती गणेश जोजारे, सासू उमा जोजारे, सासरे सुधाकर जोजारे आणि नणंद प्रिया शहाणे यांच्यावर भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!