BARAMATI CRIME : अल्टोपासून फॉर्च्यूनरपर्यंत सगळीच वाहने बारामती वाहतूक पोलिसांच्या रडारवर; काळ्या काचांविरोधात धडक कारवाई..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरात वाहतूक शाखेने ‘काळ्या काचा’विरोधात राबवलेली मोहीम आता अधिक आक्रमक केली आहे. अवघ्या १५ दिवसांत स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत तब्बल १५२ चारचाकी वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली असून त्यांना ९ लाख ७५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. गुन्हेगारी हेतूने वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच चाप लावला आहे.

या मोहिमेदरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील शोध लागला आहे. वाहनांची काळी काच उतरवून, दंड आकारून ती डिटेन करण्यात आली आहेत. याआधी वारंवार दंड केल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यामुळे, वाहतूक विभागाने मोहीमच सुरू करून थेट कारवाईचा धडाका सुरु केला. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात असून, शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी सुरू आहे.

विशेषतः कोर्ट कॉर्नर चौक, कसबा चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. वाहनांवरील नंबर प्लेट लपवणे, नंबर अतिशय लहान लिहिणे अशा पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कडक कारवाई होत आहे. काळ्या काचा लावलेल्या वाहनांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. अनेक वेळा अशा वाहनांचा वापर गुन्ह्यांमध्ये होतो. त्यामुळेच ही मोहीम गरजेची होती. गाडीच्या काचा ‘काळ्या असतील किंवा कुठे शंका वाटल्यास तात्काळ ९९२३६३०६५२ या क्रमांकावर माहिती संपर्क साधावा,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, वाहतूक पोलीस जवान सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रशांत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, सीमा साबळे, अजिंक्य कदम, माया निगडे, रूपाली जमदाडे, रेश्मा काळे, प्रज्योत चव्हाण, योगेश कातवारे,  अमोल मदने, योगेश कुंभार यांच्यासह शीघ्र कृती दलाच्या जवानांनी केली.

टुकारावर मोठी दंडात्मक कारवाई..!!

१ जानेवारीपासून २८१ काळया काचा आणि ९८५ लहान अक्षरात नंबर टाकणे, नंबर प्लेट नसणे अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ९,७५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या चालकांकडून आणि टुकार मुलांकडून जागीच जुना तसेच आताचा दंड वसूल करून काही वाहने डिटेन करण्यात आली आहेत.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!