बारामती : न्यूज कट्टा
घर पाहण्यासाठी म्हणून आलेल्या एकाने २७ वर्षीय युवतीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सूरज नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युवती घरात एकटी असताना सूरज हा घर बघण्याच्या बहाण्याने दोन मित्रांसह आला. त्याने संपूर्ण घराचा व्हिडिओ बनवत आपल्या मित्रांना बाहेर पाठवले. त्यानंतर त्याने घराची कडी लावत संबंधित युवतीकडील मोबाईल हिसकावून घेतला.
कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. एवढ्यावरच न थांबता मी तुला पैसे देतो, तू कुणालाही काही सांगू नको असं म्हणत शिवीगाळ करून घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर या युवतीने बारामती तालुका पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार दिली. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आ





