BARAMATI CRIME : महाविद्यालयात निघालेल्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार; बारामती शहरानजीक घडला धक्कादायक प्रकार

बारामती : न्यूज कट्टा   

बारामतीत एका महाविद्यालयात निघालेल्या अल्पवयीन मुलीला धमकावत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेऊन कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती शहारानजीक शारदानगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनिरुध्द उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा. चंद्रमणीनगर, बारामती) याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरिक शोषण,  बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमांन्वये अनिरुद्ध त्रिकुंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित पिडीत अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जात असताना आरोपी हा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन थांबायचा. त्या ठिकाणी तिला धमकावून आपल्या कारमध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन जायचा. त्या ठिकाणी कारमध्येच तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. या प्रकरणी संबंधित पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!