BARAMATI CRIME : चारित्र्याच्या संशयातून पतीने केले पत्नीवर वार; उपचारादरम्यान झाला मृत्यू, बांदलवाडी येथील घटना

बारामती : न्यूज कट्टा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने धारदार शस्त्राने वार करत तिचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

संजना लहू वायकर (वय ४०) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्या खूनप्रकरणी पती लहू रामा वायकर (वय ४८, रा. बांदलवाडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लहू वायकर आणि संजना वायकर यांच्यात सातत्यानं वाद होत होते. लहू हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच २५ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला.

लहूने आपल्याकडील धारदार शस्त्राने संजनाच्या डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर वार केले. यात संजना ही गंभीररित्या जखमी झाली. तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणी भगवान हनुमंत बिसदवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी लहू वायकर याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक राऊत करीत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!