BARAMATI CRIME : आई अंगण झाडायची अन् तो करायचा अत्याचार; मुलगी गरोदर झाल्यानंतर उघड झाला प्रकार..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील देसाई इस्टेट परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी आई अंगण झाडत असताना एकाने सातत्याने एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित पीडिता गरोदर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यातील फिर्यादी या त्यांच्या राहत्या घराबाहेरील अंगण झाडायला जायच्या. त्यावेळी अज्ञात इसम येवून फिर्यादीच्या मुलीवर जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार करत असे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या काळात ही घटना घडली आहे. यातूनच संबंधित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास दोन ते तीन वेळा हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीने या पीडितेवर अत्याचार करतानाच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समोर आलं आहे. या घटनेनंतर पीडितेच्या आईने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!