BARAMATI CRIME : बारामती एमआयडीसीत ट्रकच्या बॅटरींची चोरी; बारामती तालुका पोलिसांनी एकाला केली अटक

बारामती : न्यूज कट्टा

बारामती एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरून लंपास करणाऱ्या चोरट्याला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे जनार्धन रघुनाथ रांधवन (वय-३१) यांचा (एमएच १४ डीएम ९१८१) क्रमांकाचा टाटा ११०९ ट्रक दि.२५नोव्हेंबर रोजी सकाळी कल्याणी कंपनीसमोर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी दि.२६ रोजी सकाळी ते ट्रककडे गेले असता ट्रक सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायरी तुटलेल्या अवस्थेत व बॅटरी गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरीचा काहीच मागमूस लागला नाही.

याबाबत त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेली बॅटरी सुमारे दहा हजार रुपये किमतीची आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित शिवम प्रेमप्रकाश यादव (रा. घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) यास ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने ट्रकची बॅटरी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली बॅटरी हस्तगत केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, अमोल पवार, भारत खारतोडे यांनी केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!