बारामती : न्यूज कट्टा
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलनं दणदणीत विजय मिळवला आहे. सर्वच गटातील उमेदवारांनी मोठ्या फरकाने या निवडणुकीत विजय मिळवत कारखान्यावरील वर्चस्व कायम राखलं आहे.
काल सकाळी ९ वाजता बारामतीतील प्रशासकीय भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजल्यानंतर प्राथमिक कल यायला सुरुवात झाली. मतदान मतपत्रिकेवर असल्यामुळं मोजणीला विलंब होत होता.. तशी कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली जात होती. पहाटेपर्यंत झालेल्या मोजणीनंतर संपूर्ण निकाल हाती आला.
यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलनं सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
छत्रपती कारखाना निवडणुक गटनिहाय निकाल :
गट क्र. १ : लासुर्णे : पृथ्वीराज जाचक 11694
शरद जामदार 10529
संजय निंबाळकर 4850
प्रताप पवार 4197
गट क्र. २ : सणसर : रामचंद्र निंबाळकर 10929
शिवाजी निंबाळकर 10431
संग्राम निंबाळकर 5162
महादेव शिरसाट 3957
गट क्र. ३ : उद्धट : गणपत कदम 9297
करणसिंह घोलप 6961
पृथ्वीराज घोलप 9672
तानाजी थोरात 4721
गट क्र. ४ : अंथुर्णे : प्रशांत दराडे १११८०
अजित नरुटें ११०९०
विठ्ठल शिंगाडे १०२३५
गट क्र. ५ सोनगाव : अनिल काटे : ११७८९
बाळासाहेब कोळेकर : ११७६८
संतोष मासाळ : १०३०७
गट क्र. ६ : गुणवडी : कैलास गावडे : ११८३२
निलेश टिळेकर : ११५६३
सतीश देवकाते : ११२६१
इतर मागास प्रवर्ग : तानाजी शिंदे ११३५८
विरोधी
संदीप बनकर ५१६६
अनुसूचित जाती : मंथन कांबळे ११५११
बाळासाहेब कांबळे ४९६१
भटक्या विमुक्त जाती : योगेश पाटील ११८४३
तुकाराम काळे ४१७२
अशोक देवकाते ३१५
ब वर्ग : अशोक पाटील 260
महिला प्रतिनिधी : सौ.माधुरी राजपुरे १०७७४ सौ. सुचिता सपकळ १०३८४





