बारामती : न्यूज कट्टा
इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथील प्रशासकीय भवनात होत आहे. त्यामध्ये लासुर्णे, सणसर, उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये उद्धट गटात चुरशीची लढत होत असून सर्व ठिकाणी जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आज सकाळी ९ वाजता बारामती येथील प्रशासकीय भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. ३८ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीत लासुर्णे, सणसर, उद्धट आणि अंथुर्णे या चार गटाची मोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये जय भवानीमाता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. उद्धट गटात मात्र गणपत कदम आणि करण घोलप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
गटनिहाय उमेदवार व मिळालेली मते
गट क्र. १ : लासुर्णे :
पृथ्वीराज जाचक ५४१८
शरद जामदार ४७७७
संजय निंबाळकर २८८०
प्रताप पवार २६८३
गट क्र. २ : सणसर
रामचंद्र निंबाळकर ५०१६
शिवाजी निंबाळकर ४६७४
संग्राम निंबाळकर ३२८९
महादेव शिरसाट २४६९
गट क्र. ३ : उद्धट
गणपत कदम ४१३०
करण घोलप ४०८९
पृथ्वीराज घोलप ४५६२
तानाजी थोरात २७२३
गट क्र. ४ : अंथुर्णे
प्रशांत दराडे ५२३४
अजित नरुटे ५१०३
विठ्ठल शिंगाडे ४७२३
बाबासो झगडे २९८१
राजेंद्र कुमार पाटील २९५९





