BARAMATI ELECTION : बारामती नगरपरिषद निवडणुकीत गणेश जोजारे यांच्या उमेदवारीची सर्वधर्मीयांकडून मागणी; नेमकं कारण काय..?

बारामती : न्यूज कट्टा  

बारामती शहरात सर्वधर्मसमभाव या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सराफ व्यावसायिक गणेश जोजारे यांनी बारामती नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १७ मधून उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या या उमेदवारीसाठी आता सर्वधर्मीय नागरीक आणि संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन कार्यरत असणाऱ्या गणेश जोजारे यांना संधी मिळाल्यास सर्वधर्मसमभावाची नांदी बारामतीत पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

गणेश जोजारे हे सिद्धिविनायक फाउंडेशनचे संस्थापक असून बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, ३० हजार वह्यांचे वाटप, विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे, सर्वधर्मसमभाव संघटनेचेही ते संस्थापक आहेत. त्यांनी या माध्यमातून ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, पैगंबर जयंती, नरहरी महाराज जयंती अशा अनेक जयंती आणि उत्सवांचे आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे.

गणेश जोजारे हे सराफ व्यावसायिक आणि सोनार समाजातील प्रमुख म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांनी तळागाळातील समाज घटकांशी संपर्क ठेवत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळेच त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या प्रभाग १७ म्हणून नगरसेवकपदाची मागणी केल्यानंतर सर्वधर्मीय नागरिकांसह अनेक संघटनांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. कसब्यातील तरुण वर्गानेही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत अजितदादांना निवेदन दिले आहे.

दुसरीकडे बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात सोनार समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे गणेश जोजारे यांच्या माध्यमातून सोनार समाजाला न्याय देण्याची संधी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मिळाली आहे. त्याचवेळी त्यांचा तळागाळात असणारा जनसंपर्क आणि सर्वधर्मीय नागरिकांशी असणारी बांधिलकी यामुळे त्यांच्या विजयात कसलाही अडथळा येणार नाही असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

कामाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर गणेश जोजारे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. सामाजिक कार्य करताना प्रशासकीय जोड असणे आवश्यक आहे. तळागाळातील लोकांशी संपर्क आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ यातून नगरपरिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यामुळं अजितदादा आपल्याला नक्कीच संधी देतील आणि त्या संधीचे आपण सोने करून दाखवू असं गणेश जोजारे यांनी म्हटलं आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!