BARAMATI : विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा 3WD सॉफ्ट कंपनीशी सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नोकरीच्या संधी..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने 3WD सॉफ्ट या नामांकित कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. महाविद्यालयाच्या  बीबीए (सीए), बीएससी (सीएस),एमएससी (सीएस), बीएससी (सीए) विभागाच्या पुढाकारातून हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासह नोकरीच्याही संधी उपलब्ध होणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ.लालासाहेब काशिद, आय क्यू एसी समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, बीबीए (सीए) विभागप्रमुख महेश पवार, बीएससी (सीए) विभागप्रमुख किशोर ढाणे, एमएससी (सीएस) समन्वयक डॉ. जगदीश सांगवीकर यांच्यासह   3WD सॉफ्ट कंपनीचे किशोर काजळे, सुरेंद्र थोरात, हनुमंत फरांदे यांच्या स्वाक्षरीने हा करार नुकताच करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान संशोधन, उद्योजकता आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतानाच जागतिक मानकाबद्दलही ज्ञान मिळणार आहे. नाविन्यपूर्णतेद्वारे विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याचे महाविद्यालयाचे ध्येय असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न या करारांतर्गत केले जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शाश्वत नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत.

हा सामंजस्य करार पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशिद, समन्वयक नीलिमा पेंढारकर यांचे सहकार्य लाभले. बीबीए (सीए) विभागप्रमुख महेश पवार, संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, बीएसीसी (सीए) विभागप्रमुख किशोर ढाणे, गौतम कुदळे, डॉ. जगदीश सांगवीकर, विशाल शिंदे,  अनिल काळोखे, एमओयु समन्वयक पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम, अक्षय  शिंदे, कांचन खिरे यांनी या करारासाठी विशेष प्रयत्न केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!