BARAMATI NEWS : सकाळच्या थंडीत अजितदादांनी घेतला चहाचा आस्वाद; बारामतीकरांशी संवाद साधताना फोटोवरून चहा विक्रेत्याला मिश्किल टोला

बारामती : न्यूज कट्टा   

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. याच स्वभावामुळं ते आपल्या भाषणातून उपस्थितांच्या टाळ्या मिळवत असतात. आज सकाळी अजितदादांनी बारामतीतील एका चहाच्या स्टॉलवर जाऊन चहाचा आस्वाद घेतला. आपल्यासोबत ज्यांनी चहा घेतला त्याचे पैसे देण्यास सहकाऱ्याला सांगत असतानाच चहा विक्रेत्यानं फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अजितदादांनी एक फोटो १०० रुपयांना असं उत्तर देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी कालच राष्ट्रवादीच्या वतीने प्रचार सांगता सभा घेण्यात आली. या सभेनंतर बारामतीत मुक्कामी असलेल्या अजितदादांनी आज सकाळी बारामती शहरात फेरफटका मारला. यादरम्यान, त्यांनी बारामतीतील आकाश टी कॉर्नर या चहा स्टॉलला भेट देत चहाचा आस्वाद घेतला. आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी चहा सांगितला.

चहा पिऊन झाल्यानंतर त्यांनी सोबतच्या सहकाऱ्याला चहाचं बिल देण्यासाठी सांगितलं. त्यावेळी चहा विक्रेत्यानं फोटोसाठी अजितदादांना विनंती केली. त्यावर उत्तर देताना एका फोटोचे शंभर रुपये असं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नेहमीच धीरगंभीर असणाऱ्या अजितदादांचा हा मिश्किल स्वभाव उपस्थितांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. दरम्यान, अजितदादांनी चहाच्या निमित्तानं जमलेल्या बारामतीकरांशी मनमोकळा संवाद साधला.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!