BARAMATI RTO : बारामती आणि परिसरात वाहनचालकांकडून नियमांचं उल्लंघन; आरटीओंच्या कारवाईत ५६ लाखांचा दंड वसूल

बारामती : न्यूज कट्टा

बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये ७९९ वाहनावर केलेल्या कारवाईत १ हजार ५०४ गुन्ह्यात वाहनमालक, वाहनचालकांकडून ५६ लाख २५ हजार २५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑगस्ट महिन्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. यामध्ये अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ३०५ गुन्हे, विना हेल्मेट वाहन चालविणे १६२, सीट बेल्ट न लावणे १३, अवैध विमाप्रकरणी २२९, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली वाहने ७१, वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर २६, रिफ्लेटर आणि टेल लॅम्प नसणे ५३, दारु पिऊन वाहन चालवणे १३, ताडपत्री अच्छादन नसणे १६, काळी फिल्म लावणे ४, अनुज्ञाप्ती १३२, वाहन परवाना ३३, योग्यता प्रमाणपत्र २४०, वायु प्रदुषण प्रमाणपत्र २०७ असे एकूण १ हजार ५०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सातत्याने वाहनांची तपासणीचे काम सुरु आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिक तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना वाहनचालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!