निरा : न्यूज कट्टा
धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. सकाळी वीर धरणातून निरा नदीत १४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली असून २३ हजार १८५ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वीर धरणातही पाणी पातळी वाढत असून ती ५७९ मीटर इतकी झाली आहे. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
पावसाचं वाढतं प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता निरा नदीतील विसर्ग वाढवला जात आहे. सकाळी १४ हजार क्युसेस असलेला विसर्ग आता वाढवण्यात आला असून सद्यस्थितीत निरा नदीत २३ हजार १८५ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. निरा नदीत होणारा विसर्ग वाढवला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





