BIG BREAKING : धरणक्षेत्रातील पावसाचा जोर वाढला; वीर धरणातून आता निरा नदीत ३२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

निरा : न्यूज कट्टा    

धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. सकाळी वीर धरणातून निरा नदीत १४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर २३ हजार १८५ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा यात वाढ करण्यात आली असून आता ३२ हजार ४५९ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यासह धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वीर धरणातही पाणी पातळी वाढत असून ती ५७९ मीटर इतकी झाली आहे. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

पावसाचं वाढतं प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता निरा नदीतील विसर्ग वाढवला जात आहे. सकाळी १४ हजार क्युसेस असलेला विसर्ग वाढवत निरा नदीत २३ हजार १८५ क्युसेस पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा यात वाढ करण्यात आली असून ३२ हजार ४५९ क्युसेस इतका विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!