BIG BREAKING : बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर; पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ झालेल्या गोळीबारात मृत्यू..!

बदलापूर : न्यूज कट्टा   

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. दोन चिमूरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आहे. रिमांडसाठी नेताना अक्षयने एका अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

बदलापूर येथील एका शाळेतली दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेले जात होते. त्यावेळी त्याने सोबत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावत पोलिसांवरच तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यामध्ये अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागली आणि दुसरी शरीरावर लागली.

या घटनेनंतर अक्षयला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. दुसरीकडे अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारात सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी आणि पोलिस यंत्रणेवर आरोप सुरू केले आहेत. तर बदलापूरमधील नागरिकांनी फटाके वाजवत पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!