बारामती : न्यूज कट्टा
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज जय भवानीमाता पॅनलची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक किरण गुजर आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. या पार्श्वभूमीवर चारशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना साद घातली असून पुढील पाच वर्षे कारखान्याची सूत्रे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली होती.
छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत असून येणाऱ्या पाच वर्षात हा कारखाना उर्जितावस्थेत आणण्याचा मनोदयही अजितदादांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं या निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडण्यावर भर देण्यात आला आहे.
जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : गट क्र. १ लासुर्णे : पृथ्वीराज साहेबराव जाचक, जामदार शरद शिवाजी गट क्र. २ सणसर : निंबाळकर रामचंद्र विनायक, निंबाळकर शिवाजी रामराव गट क्र. ३ उद्धट : घोलप पृथ्वीराज श्रीनिवास, कदम गणपत सोपान,गट क्र. ४ अंथुर्णे : शिंगाडे विठ्ठल पांडुरंग, दराडे प्रशांत दासा, नरुटे अजित हरीश्चंद्र गट क्र. ५ सोनगाव : अनिल सीताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर, संतोष शिवाजी मासाळ, गट क्र. ६ गुणवडी : कैलास रामचंद्र गावडे, सतीश बापूराव देवकाते, निलेश दत्तात्रय टिळेकर, ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन : पाटील अशोक संभाजीराव, अनुसूचित जाती / जमाती : मंथन बबनराव कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी : सौ. राजपूरे माधुरी सागर, सौ. सपकळ सुचिता सचिन, इतर मागास प्रवर्ग : शिंदे तानाजी ज्ञानदेव, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास : डॉ. श्री पाटील योगेश बाबासाहेब





