BIG BREAKING : बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता; बारामती तालुक्यात जल्लोष

बारामती : न्यूज कट्टा

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण हा विजेता ठरला आहे. बारामती तालुक्यातील मूर्टी-मोढवे या गावातून रील स्टार म्हणून उदयाला आलेल्या सूरजने बिग बॉस मराठीचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशानंतर बारामती तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त होत असून मोढवे ग्रामस्थांनी जल्लोष करत सूरजचं अभिनंदन केलं आहे.

बारामती तालुक्यातील मूर्टी-मोढवे येथील सूरज चव्हाण हा रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात त्याचा समावेश झाल्यानंतर त्यानं देशभरात स्वत:ची क्रेझ निर्माण केली. त्यानंतर त्याच्या बिग बॉसच्या घरातील वावराची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्याचा साधेपणा आणि वागणूक या गोष्टी सातत्याने चर्चेचा विषय ठरला.

आज बिग बॉस मराठीच्या अंतिम सोहळ्यात सूरज चव्हाण हा विजेता ठरल्याची घोषणा अभिनेता आणि या शोचे निवेदक रितेश देशमुख यांनी केली. त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. ही बातमी समजल्यानंतर बारामती तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. दुसरीकडे मोढवे ग्रामस्थांकडूनही सूरजच्या यशाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!