BIG BREAKING : सोमेश्वर कारखान्यात आर्थिक अपहार; दोषींवर निलंबनासह कायदेशीर कारवाईचा संचालक मंडळाचा निर्णय 

सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा 

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदीमध्ये अफरातफर करुन संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व लिपिक व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यातील दोषींवर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देवून गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीही कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

याबाबत पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असताना कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याच घटकाला पाठीशी घालू नये अशी कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संचालक मंडळास वेळोवेळी सुचना असते. त्यानुसारच संचालक मंडळ कामकाज करत आहे. परंतु काही अधिकारी आणि कामगारांनी जाणीवपुर्वक कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे कामकाज केल्याचे निदर्शनास आले आहे. 

या अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेवून या प्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन सखोल चौकशी केली जाणार आहे.  

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेवून २०१५ पासून आजपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज इत्यादीची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे संचालक मंडळाच्या वतीने समस्त सभासद व शेतकरी यांना आश्वस्त करत आहोत असेही जगताप यांनी नमूद केले. 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!