BIG BREAKING : अजितदादा अध्यक्ष असलेल्या माळेगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; उसाला प्रतिटन ३३०० रुपये देण्याचा निर्णय

बारामती : न्यूज कट्टा

सोमेश्वर आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केल्यानंतर अजितदादा अध्यक्ष असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा दर काय असेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. ही प्रतीक्षा आता संपवत माळेगाव कारखान्याने चालू वर्षात गळीत होणाऱ्या उसाचा पहिला जाहीर केला आहे. प्रतिटन ३३०० रुपये पहिला हप्ता देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा एफआरपीनुसार ३२७० रुपये इतका पहिला हप्ता होत आहे. याबाबत संचालक मंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार ३३०० रुपये पहिला हप्ता देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. त्यानुसार आज कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यानुसार लवकरच सभासदांना ही रक्कम अदा केली जाणार आहे.

सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्याकडून काही दिवसांपूर्वीच पहिला हप्ता जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर अजितदादांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या माळेगाव कारखान्याचा पहिला हप्ता किती असणार याबाबत चर्चा सुरू होत्या. आज माळेगाव कारखान्याने पहिल्या हप्त्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभासद शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!