BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टला अपघात; पहिल्या मजल्यावरून अचानक लिफ्ट कोसळली, बीडमधील घटना..!

बीड : न्यूज कट्टा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे बीड शहरातील एका रुग्णालयात गेले असताना त्यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्टमधून जात असताना पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट अचानक कोसळली. त्यामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

मनोज जरांगे पाटील हे आज बीडच्या दौऱ्यावर होते. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी एका रुग्णाची भेट घेण्यासाठी जात असताना ते सहकाऱ्यांसह लिफ्टमध्ये दाखल झाले. लिफ्ट सुरु झाल्यानंतर काही वेळातच पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सुखरूप बचावले आहेत. या घटनेनंतर काही काळ या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लिफ्ट कोसळल्यानंतर दरवाजे तोडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!