BIG BREAKING : आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांच्या हत्येची मामीनेच दिली सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट

पुणे : न्यूज कट्टा 

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या घडवली गेल्याचंही आता समोर आलं आहे.

९ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मामांची निर्घृणपणे झालेली हत्या चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्यांनी ही सुपारी दिल्याची चर्चा होती. मात्र आता पोलिस तपासात सतीश वाघ यांच्या पत्नीनेच ही सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

उद्योजक असलेले सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी ब्ल्यू बेरी हॉटेलजवळ चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी रात्रीच सतीश वाघ यांचा मृतदेह मिळून आला होता. त्यामध्ये वाघ यांच्यावर ७२ वेळा वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं होतं.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच या प्रकरणात चार जणांना अटकही केली. पाचव्या आरोपीला पोलिसांनी काल धाराशीवमधून अटक केली. त्यानंतर ही हत्या सतीश वाघ यांच्या पत्नीनेच घडवून आणल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी वाघ यांच्या पत्नीला अटक केली असून येणाऱ्या काळात या हत्येमागील सत्य उघडकीस येणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!