पुणे : न्यूज कट्टा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी संदीप सिंग गिल यांची पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या संदीपसिंग गिल यांची पुणे जिल्हा पोलिस आधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीपसिंग गिल यांची गेल्याच वर्षी पुण्यात उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे एक वेगळा ठसा उमटवला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेल्या संदीपसिंग गिल यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आता पुणे ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका जिल्ह्याला अनुभवता येणार आहे.





