BIG BREAKING : अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आला समोर; ‘या’ कारणांमुळे अपघात झाल्याचा अंदाज

मुंबई : न्यूज कट्टा  

उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराच्या निमित्तानं बारामतीत येत असताना त्यांच्या विमानाला दि. २८ जानेवारी रोजी अपघात झाला. यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अशातच या घटनेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. पायलटचा चुकलेला अंदाज आणि विमानातील तांत्रिक बिघाड या दोन कारणांमुळे हा अपघात झाल्याचं या अहवालात स्पष्ट केलं आहे.

दि. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून विमानाने येत होते. विमानतळाजवळच त्यांचे विमान कोसळून झालेल्या अपघातात अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरलेली आहे. सुरुवातीला धुक्यामुळे विमान उतरवण्यात अडचणी आल्याचं सांगितलं गेलं. मात्र आता या अपघाताबद्दल प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे.

या अहवालानुसार पायलटचा चुकलेला अंदाज आणि विमानात झालेला तांत्रिक बिघाड या दोन कारणांमुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईहून बारामतीत दाखल झाल्यानंतर विमान उतरवत असताना पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नाही. तसेच विमानाच्या नियंत्रण प्रणाली आणि इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी समस्या उदभवली. त्यामुळं लॅंडींगचा अॅंगल चुकला असावा, त्यातून विमान धावपट्टी सोडून बाजूला आदळले असं बोललं जात आहे.

ब्लॅक बॉक्सची माहिती घेण्यास सुरुवात

या घटनेनंतर विविध यंत्रणांकडून या अपघाताची चौकशी केली जात आहे. त्यानुसार विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. या ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच या अपघाताचं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!