बारामती : न्यूज कट्टा
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सचिन सातव यांनी बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बारामती बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत सचिन सातव यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी ओंकार देवळे यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सातव यांनी राजीनामा दिला आहे.
बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सचिन सातव यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. संचालक मंडळाने सातव यांचा राजीनामा मंजूर करत रिक्त झालेल्या जागी संचालक म्हणून ओंकार किशोर देवळे यांची निवड केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार देवळे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या बैठकीत संचालक मंडळाने सचिन सातव यांनी बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल आभार मानत नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीला बँकेच्या उपाध्यक्षा नूपुर शहा वडुजकर, तज्ञ संचालक प्रीतम पहाडे, शिरीष कुलकर्णी, संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजय गालिंदे, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजीत धुमाळ, मंदार सिकची, सौरभ मुथा, संचालिका वंदना पोतेकर, कल्पना शिंदे यांच्यासह रमेश गानबोटे, कार्यकारी संचालक विनोद रावळ उपस्थित होते.





