पुणे : न्यूज कट्टा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांचे पुढील चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सततची धावपळ आणि दौऱ्यांची दगदग यामुळे शरद पवार यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा काल कोल्हापूर दौरा होता. त्यानंतर त्यांचा कराड दौरा होता. मात्र सततची धावपळ आणि दौरे यामुळे त्यांना त्रास होत आहे. घशासह सर्दीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे पुढील चार दिवसांचे दौरेही रद्द करण्यात आले आहेत.
सध्याचं बदलतं वातावरण आणि दौऱ्यांमध्ये होणारी दगदग यामुळे शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. शरद पवार यांना सर्दी आणि घशाचा त्रास होत आहे. त्यामुळे पुढे काही दिवस आराम घेणे आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानुसार शरद पवार हे पुढील काही दिवस आराम करणार आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांचं नियमित कामकाज सुरू होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.





