BIG BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूरक्षेत वाढ; राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडूनही अतिरिक्त सुरक्षा..!

मुंबई : न्यूज कट्टा   

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यातील विविध घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

देशातील महत्वाच्या नेत्यांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांना राज्य सरकारकडून झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. परंतु आजपासून या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारकडून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासोबत आजपासून सीआरपीएफचे दहा जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  शरद पवार हे सतत विविध दौरे करत असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे अनेक लोकांचं येणं जाणं सुरू असतं. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दुसरीकडे राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणावरुन वाद सुरू आहे. त्यातच शरद पवार हे सतत विविध भागातील दौरे करत आहेत. येणाऱ्या काळात आरक्षणाचा विषय आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!