BIG BREAKING : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार..?

पुणे : न्यूज कट्टा

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावरच लढण्यावरही सहमती झाली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्याच्या मुभा देण्यात आल्याचीही माहिती आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीने सावध पावले उचलल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढवली. मात्र अपेक्षित यश न मिळाल्यानं आता या पक्षातील नेत्यांनी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षातील उमेदवारांनी घड्याळ याच चिन्हावर लढण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मतांचं विभाजन टळावे आणि चिन्हाची अडचण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हांवर लढल्याचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. तसेच प्रचारातही चिन्हाची अडचण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील उमेदवारांना घड्याळ चिन्हावरच लढण्याची मुभा दिली जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन चिन्ह ठरवण्याचे अधिकारही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. असे असले तरी बहुतांश ठिकाणी घड्याळ चिन्हाला पसंती असल्यानं या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर अनेक उमेदवार रिंगणात दिसतील अशी शक्यता आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंद बाग येथे भेट घेतली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकाच चिन्हावर लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आज पुण्यात त्यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेत बैठकीत सहभाग घेतला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवण्याच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादीकडून तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!