बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची अजितदादा पाहणी करतील. त्यानंतर साडेनऊ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार होणार आहे. दिवसभरात अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवारी दि. ४ ऑगस्ट रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजता ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करुन ते सकाळी ९ वाजता शारदा प्रांगण येथे आयोजित एक कुटुंब एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्ष वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
सकाळी साडेनऊ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आलेल्या नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच दुपारी १.३० वाजता काटेवाडी येथील शिवशंभो ट्रेडर्स व हार्डवेअर दुकानाचं उदघाटन आणि शेतकरी मेळाव्याला अजितदादा उपस्थित राहतील.
दुपारी ३ वाजता बारामती तालुक्यातील सांगवी येथे आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थान भुमीपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ४ वाजता माळेगाव बुद्रूक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सीएनसी सिम्युलेशन लॅबचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होईल. सायंकाळी ५.३० वाजता जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्यापासून बोरकरवाडीपर्यंतच्या पाईपलाईनचे भुमीपूजन होणार आहे.





