BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना फायर एनओसी; नगरपरिषदेसमोर उपोषणाचा दूसरा दिवस, अधिकाऱ्यांकडून केले जातेय दुर्लक्ष..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना फायर एनओसी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे. मात्र, अग्निशमन विभागाचे अधिकारीच गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. अशातच नगरपरिषदेचे मुख्याधिकारीही अनुपस्थित असल्यामुळे नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल कोण घेणार असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

बारामती शहरात बेकायदेशीर अकॅडमींनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. शासनाची कोणतीही परवानगी नसताना गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणूक करण्याचा धंदाच या अकॅडमींकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण हे गेल्या काही काळापासून आंदोलन करत आहेत. मागील वर्षी प्रशासनाने फायर ऑडिट नसलेल्या अकॅडमी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र ऑडिट नसलेल्या एकाही अकॅडमीवर कारवाई झाली नाही.

या दरम्यान, बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाद्वारे या अकॅडमींना फायर एनओसी देण्यात आले. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीच या अकॅडमींना पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. परिणामी मोहसीन पठाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत बारामती नगरपरिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दूसरा दिवस असतानाही बारामती नगरपरिषदेचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकलेला नाही.

अग्निशमन विभागाचे अधिकारी गायब    

मोहसीन पठाण यांनी बेकायदेशीर अकॅडमींना फायर एनओसी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निवेदन दिल्यानंतर बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी गायब झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणारे हे अधिकारी गायब झाल्यामुळे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मुख्याधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष

बारामती नगरपरिषदेशी संबंधित अधिकारी मनमानी करून बेकायदेशीर अकॅडमींना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे मोहसीन पठाण यांनी याबाबत कारवाईची मागणी करत उपोषणाला सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू असून मुख्याधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांना मुख्याधिकारी पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!