BIG NEWS : सुनेत्रा पवार यांच्याकडून गुलाबाचं फूल, तर पार्थ पवार यांची मिठी; भल्या सकाळी अजितदादांचं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘बर्थडे सेलिब्रेशन’

पुणे : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. आज अजितदादांनी भल्या सकाळी आपल्या पुण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला. खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचं फूल देऊन आणि ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मिठी मारत शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांसोबतचं अनोखं सेलिब्रेशन उरकून अजितदादा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांशी संवाद साधण्यासाठी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज वाढदिवसादिवशीच अजितदादांनी महिला भगिनींशी संवाद साधण्याचा निर्णय घेत पुण्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. तत्पूर्वी सकाळी पुण्यातील जिजाई निवासस्थानी अजितदादांचा वाढदिवस कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अजितदादांच्या आई आशाताई पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, भगिनी विजया पाटील, पुत्र पार्थ आणि जय यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचं फूल देत शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांबद्दल अजितदादांनी सोशल मिडियात पोस्ट करत आभार मानले. याचवेळी अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मिठी मारत अजितदादांना शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांसोबतचं हे अनोखं सेलिब्रेशन उरकून अजितदादांनी निवासस्थानी आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचाही स्वीकार केला. त्यानंतर ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!