बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर येत आहेत. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये सकाळी १० वाजता अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून दुपारी साडेतीननंतर बारामतीत विविध मंडळांनी आयोजित केलेल्या गणेश फेस्टिव्हलच्या उदघाटन कार्यक्रमांना अजितदादा भेटी देणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत येत आहेत. सकाळी १० वाजता त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार होणार आहे. यामध्ये अजितदादा नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. यानंतर राष्ट्रवादी भवनातील सभागृहात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये बारामती शहर व परिसरातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता अजितदादा अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाने आयोजित केलेल्या श्रीमंत आबा गणपती महोत्सवाला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजता नटराज नाट्य कला मंडळाने आयोजित केलेल्या बारामती गणेश फेस्टिव्हलला सदिच्छा भेट देतील. तसेच सायंकाळी ५ वाजता सूर्यनगरी येथील अनंत युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गणेश फेस्टिव्हल २०२४ ला भेट देऊन अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.





