बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी अजितदादांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा होणार आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजितदादा अॅक्शन मोडवर असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे.
उद्या सायंकाळी ६.३० वाजता बारामती शहरातील राजमाता जिजाऊ सभागृहात बारामती व्यापारी महासंघ आणि बारामती मर्चंट असोसिएशनच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यास उपस्थित राहून अजितदादा उपस्थिती व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर रात्री ८ वाजता बारामती क्लब येथे होणाऱ्या बारामती बिल्डर असोसिएशनच्या मेळाव्यास अजितदादा उपस्थित राहतील. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करून संवादही साधणार आहेत. विधानसभा निवडणूकीची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने अजितदादा अॅक्शन मोडवर आले असून ते विविध घटकांशी संवाद साधणार आहेत.





