बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. १९ जुलै रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटेपासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून दिवसभरात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दि. १९ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील.
दुपारी २ वाजता बारामती शहरातील मारवाड पेठ येथील लाईट झोन या शोरूमला अजितदादा भेट देतील. तसेच २.३० वाजता भिगवण रस्त्यावरील शर्वरीज हेल्दी बाईट या हॉटेलचं उदघाटन होणार आहे. त्यानंतर ३ वाजता गोजुबावी येथील ओमराज पेट्रोलियम या पेट्रोलपंपाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी ४ वाजता ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील.





