BIG NEWS : अजितदादा उद्या इंदापूरमध्ये; सकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन, दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचाही होणार शुभारंभ

इंदापूर : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी इंदापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता अजितदादांची पत्रकार परिषद होणार असून त्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाची सभा होणार आहे. तसेच भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही अजितदादा उपस्थित राहणार आहेत.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे रिंगणात असणार आहेत. प्रवीण माने, हर्षवर्धन पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या शुक्रवारी आमदार दत्तात्रय भरणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी अजितदादाही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सकाळी ११ वाजता इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे अजितदादांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता जुन्या बाजार समिती मैदानात दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अजितदादांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

मागील काही दिवसातील राजकीय घडामोडीनंतर प्रथमच अजितदादा इंदापूरमध्ये येत आहेत. त्यातच सकाळी ते पत्रकार परिषदही घेत आहेत. त्यामुळे उद्या अजितदादांकडून कोणत्या विषयांवर भाष्य होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!